सोलापूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त मनपातर्फे अभिवादन करण्यात आले. कौन्सिल हॉल येथे आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये कलाम यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे,सिद्धू तिमिगार,अशोक खडके,नामदेव विटकर आदी मान्यवर उपस्थित होते.