वंचिता सोबत रंगपंचमी आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे राबवण्यात आला आजचा उपक्रम रंगपंचमीचा रंगिबेरंगी रंगात न्हाऊन निघाला संस्कार संजिवनी अनाथ आश्रम संस्कार संजीवनी अनाथ आश्रम च्या मुला मुलींसोबत यंदाची रंगपंचमी साजरा करण्यात आली आहे.
प्रत्येक जण आपापल्या घरात रंगपंचमी साजरा करतात पण आस्था रोटी बँक हे अनाथ आश्रम च्या मुलासोबत रंगपंचमी साजरा करताना दिसून येते.

ज्या मुलांना सणवार माहीत नसते अशा मुलांसोबत रंगपंचमी साजरा करतात पण त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद खुशी दिसून आले अशा मुलांसोबत रंगपंचमी साजरा करताना आस्था रोटी बँकेचे संपूर्ण टीम रंगपंचमी साजरा केली.

त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप काही सांगून येते तेथील मुला-मुलींना आपल्या घरचे आठवण सुद्धा होऊ देत नाहीत अशा मुलांसोबत रंगपंचमी खूप उत्साहामध्ये आस्था रोटी बँक साजरा केले
आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे यांनी अनाथ आश्रम च्या मुलांसोबत संपूर्ण टीम सहभागी झाले होते त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य खूप भावून गेले जेथे कमी तेथे आम्ही असे आमचे महिला सदस्यांनी म्हटले
अनाथ आश्रम च्या मुला मुलींना जेवण देण्यात आले आहे.
त्यामध्ये बासुंदी, जिलेबी, चपाती बटाट्याची भाजी व मसाला भात देण्यात आले.

तसेच मुलांना व मुलींना पिचकारी इको फ्रेंडली कलर रंग फुगे कोल्ड्रिंक इत्यादी देण्यात आले आहे.
संस्कार संजीवनी संजीवनी आश्रम चे व्यवस्थापक परमेश्वर काळे यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले
अनाथ आश्रम च्या मुला व मुली सोबत रंगपंचमी साजरा करण्यात आलेले त्यावेळी नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, पुष्कर पुकाळे, संपदा जोशी, नीता आकुडे ,श्रद्धा अध्यापक, सरोजिनी घोडके, विद्या माने, सुरेखा पाटील, प्रकाश डोंगरे, हे सर्वजण उपस्थितीत होते.
आस्था रोटी बँक नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम करते.