सोलापूर : शिवस्मारक मंदिर येथे आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा,03 जानेवारी २०२१ सन्मान सावित्रीच्या लेकी या प्रमाणपत्रने नगरसेविका वंदनाताई गायकवाड, प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण, ॲड.वनिता चंदनशिवे, फुलावती काटे, शारदा गजभिये, सुजाता वाघमारे,आशालता आव्हाड, सविता कांबळे, मंदाकिनी शिंदे,पुष्पलता गायकवाड, हेमलता वाघमारे, डॉ.ज्योत्स्ना कोरे, डॉ. ज्योती साळवे, मुक्ता बनसोडे, सुनिता गायकवाड, बबीता काळे यांना सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी अण्णासाहेब बनसोडे आमदार पिंपरी चिंचवड पुणे, नगरसेवक प्रा. राजकुमार हंचाटे, अजितभाऊ गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष (RPI), राजेंद्र दासरी सोलापूर आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी, डॉ राजेंद्रसिंह लोखंडे प्रा. कल्याण शेट्टी महाविद्यालय अक्कलकोट, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्रदीप म्हैसेकर प्रसिद्ध कादंबरीकार. आधी उपस्थित होते.