डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी त्यांच्या अनुयायांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
सोलापूर रेल्वे विभागातून चालवल्या जाणाऱ्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे :-
कलबुर्गी – मुंबई – कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी
1. विशेष गाडी क्रमांक 01245 दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता कलबुर्गी येथून सुटेल पुढे ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकांवर रात्री 09.40 वाजता पोहोचेल आणि 10.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:20 वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01246 सीएसएमटी मुंबई येथून 7 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12:25 वाजता (6/7 डिसेंबरच्या मध्यरात्री) सुटेल पुढे हि गाडी सोलापूर रेल्वे स्थानकांवर दुसऱ्या दिवशी सकाळी 08.45 वाजता पोहोचेल आणि त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.
थांबे: कलबुर्गी, गाणगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि सीएसएमटी मुंबई.
रचना: 22 सामान्य दुसऱ्या श्रेणीचे डबे.
दरवर्षी सोलापूर येथून भरपूर प्रमाणात भिम अनुयायी हे मुंबई येथे चैत्यभूमी ला बाबासाहेबांच्या स्मृतीस वंदन करायला जात असतात. त्याच प्रमाणे यंदाच्या हि वर्षी महापरिनिर्वाण विशेष गाडीच्या वेळेची नोंद घेऊन अनुयायांनी आपला प्रवास करावा असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी केले आहे .