जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या विशेष रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन…
सोलापूर दि – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जागतिक युवा कौशल्य विकास दिन (World Youth Skills Day) चे औचित्य साधून दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन संचलित श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सभागृहात करण्यात आले आहे.
या कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये भारतभर ज्यांचे प्रमाणपत्र चालते अशा मान्यता असलेल्या प्रशिक्षण संस्था सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील प्रशिक्षणाची सुवर्णसंधी या माध्यमातून युवकांना उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाच्या लाभ घेऊ इच्छिणाऱ्या युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, नॉर्थकोट पार्क, सोलापूर येथे दूरध्वनी क्रमांकः 0217-2992956 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.
सहभागी क्षेत्रे खालीलप्रमाणेः
अ)1. शेती- दुग्धव्यवसाय शेतकरी/उद्योजक, शेळी/मेंढीपालक, सौर पंप तंत्रज्ञ. सेंद्रिय उत्पादक, मशरूम उत्पादक, मधमाश्यापालक 2. कपडे-सहाय्यक डिझायनर- कपडे, मेक-अप आणि गृह फर्निचर. स्वयंरोजगार शिंपी, नमुना घेणारा शिंपी 3. सौंदर्य आणि निरोगीपणा- हेअर ड्रेसर आणि स्टायलिस्ट, सहाय्यक सौंदर्य चिकित्सक 4. ऑटोमोटिव्ह-ऑटोमोटिव्ह सेवा तंत्रज्ञ दुचाकी सेवा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन सेवा तंत्रज्ञ- दुचाकी 5. जीएसटी सहाय्यक 6. इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर- इलेक्ट्रिशियन, मोबाइल फोन हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ, सीसीटीव्ही स्थापना तंत्रज्ञ, सौर आणि एलईडी तंत्रज्ञ, फील्ड तंत्रज्ञ संगणकीय आणि परिधीय, एलईडी लाईट दुरुस्ती तंत्रज्ञ, सौर पॅनेल स्थापना तंत्रज्ञ 7. अल-बिझनेस विश्लेषक 8.आरोग्यसेवा-आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ-बेसिक, जनरल ड्युटी सहाय्यक, गृह आरोग्य सहाय्यक 9. मीडिया आणि मनोरंजन- मेक-अप कलाकार, सोशल मीडिया व्यवस्थापक, खाते कार्यकारी 10. ग्रीन जॉब्स-सोलर ईव्ही चार्जिंग उद्योजक, सोलर पीव्ही इंस्टॉलर (सूर्यमित्र), 11. व्यवस्थापन आणि उद्योजकता सचिव, अग्निशमन दल 12. टेलिकॉम- टेरिटरी सेल्स मॅनेजर प्रीपेड/ब्रॉडबँड, टेलिकॉम कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह रिपेअर सेंटर, 13. पर्यटन आणि आतिथ्य- अन्न आणि पेय सेवा सहाय्यक, निवडक 2- पेस्ट्री बेकरी कमिशन 14. रबर-कॅड/कॅम डिझायनर- प्लास्टिक उत्पादन 15. पॉवर-इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन.
ब) आर- सिटी संस्थेचे उद्योजकता विकास प्रशिक्षण, शेळीपालन, कृषी व्यवसाय, ब्युटी पार्लर, मोवाईल दुरुस्ती व देखभाल, घरेलू उपकरणे दुरुस्ती, दुचाकी दुरुस्ती, अगरबत्ती बनविणे, नळ फिटिंग व सॅनिटरी काम, प्रवास व पर्यटन मार्गदर्शन, भाजीपाला, रोपवाटिका व्यवस्थापन यासारख्या अनेक प्रशिक्षणाच्या संधी उद्योजकता विकास प्रशिक्षण या कार्यक्रमात युवकांना स्वतःच्या विकासासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी विविध समाजगटांसाठी कार्यरत असलेल्या महामंडळांचे सहकार्य लाभणार आहे.
कार्यक्रमामध्ये स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, युवकांना व्यवसाय संधी, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पुढील महामंडळांचा समावेश आहे:
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, महात्मा फुले मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ मर्यादित, दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, महिला आर्थिक विकास महामंडळ मर्यादित
“कौशल्यवान युवा सक्षम भारत” या ध्येयाने प्रेरित होऊन, जिल्ह्यातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी मिळाव्यात, हेच या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
*कार्यक्रम तपशीलः- दिनांक: 15 जुलै 2025
वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 02.00
स्थळ: श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅड केटरिंग टेक्नॉलॉजी, विजापूर रोड, धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाजवळ, सोलापूर