येस न्युज मराठी नेटवर्क : 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एक खास डुडल तयार केलं आहे. या डुडलमध्ये भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन घडविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, हे डुडल मुंबईकर तरुण ओंकार फोंडकरने तयार केलं आहे. भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन गुगल डुडलच्या माध्यमातून घडविण्याची संधी मला मिळाली यासाठी मी अतिशय आनंदी आहे. भारताच्या विविधतेला एका कॅनव्हासवर रेखाटणं सोपी गोष्ट नाही, असं त्याने म्हटलं,