सोलापूर : सेवानिवृत्त ग्रंथपालाचे जीएसआयच्या रकमाचे बिल ट्रेझरी शाखेला पाठवण्याकरिता 25 हजाराची लाच घेणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनच्या वरिष्ठ लिपिकास अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
विजयकुमार सहदेव गाडे असे लिपिकाचे नाव आहे .तक्रारदार हे शासकिय तंत्रनिकेतन सोलापूर येथे ग्रंथपाल म्हणून नेमणुकीस होते व ते दि. ३१/०४/२०१९ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवत्त झाले आहेत. तक्रारदार यांना सेवानिवृतीनंतर ग्रॅज्युईटी च्या रक्कमा प्राप्त झाले असून जीआयएसच्या रक्कमा मिळणे प्रलंबित होते. सदर प्रकरणी तक्रारदार यांनी शासकिय तंत्रनिकेशन, सोलापूर येथे रितसर विनंती अर्ज केला होता व त्यांचे जीआयएसच्या रक्कमा अदा होणेचे अनुषंगाने कार्याला नेमणुकीस असलेले लिपीक यातील विजयकुमार गाडे यांची भेट घेवुन पाठपुरावा करत होते. परिणामी गाडे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित जीआयएस च्या रक्कमा अदा होणेच्या अनुषंगाने जीआयएसच्या रक्कमाचे बिल तयार करणे, त्यास ट्रेझरी येथे पाठविणे व त्यानंतर सदर रक्कम त्यांचे बँक खात्यावर पाठविण्याचे कामाकरीता तसेच यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षिस असे तक्रारदार यांचेकडे रुपये ४० हजारची लाचेची मागणी करत होते.
तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीनुसार पडताळणी व सापळा कारवाई केली असता गाडे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे सेवानिवतीनंतर मिळालेल्या ग्रॅज्युईटीच्या रक्कमांचे केले कामाचे बक्षिस तसेच जीएसआय बिलासंदर्भात काम करण्यासाठीचे मिळुन ४० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता रु २५०००/- लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्विकारली असता यातील आलोसे विजयकुमार सहदेव गाडे, वय 52 वर्षे, वरिष्ठ लिपीक,शासकिय तंत्रनिकेशन, सोलापूर यांना सोलापूर येथील अशोक चौकापासून संत तुकाराम चौक कडे जाणारे मुख्य रस्त्यालगत असलेल्या दि लक्ष्मी को ऑप बैंक सोलापूर च्या विरुध्द बाजुस असलेल्या पुनम टी हाऊस सोलापूरचे समोर रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी गाडे यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.