शिरूर : पुण्यातील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच, शिरूर तालुक्यातूही अशीच एक घटना समोर आली आहे. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी वरील दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे ( वय ३०) यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगी पीक गाडी चालवत होती. या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरफट नेल्याचेही समजते.