सोलापुरातील दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजीत रक्तदान शिबिरात तब्बल ४७१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्वर्गीय जयरामसा गोपाळसा दर्बी आणि स्वर्गीय सौ. अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या पुण्यतिथी निमित्त दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मंगळवारी 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत महावीर सांस्कृतिक भवन, माणिक चौक इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
स्वर्गीय जयरामसा गोपाळसा दर्बी आणि स्वर्गीय सौ. अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राजुसा काटवे, रघुनाथसा बंकापुरे यांच्याशह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं शिबीराचं उत्साहात उद्घाटन करण्यात आलं.
समाजाप्रती आपल्या जबाबदारीचे भान ठेवत दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी रक्तदान शिबीराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येतं. यंदाचं रक्तदान शिबिराचें हे सातवे वर्ष होतं . यंदाच्या वर्षी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४७१ रक्तदात्यांनी रक्तदान रक्तदान केलं. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी, सिध्देश्वर ब्लड बँक, तसचं शिवशंभू रक्तपेढी यांच्या सहकार्यानं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान राजुसा काटवे आणि रंगनाथ बंकापुरे यांनी दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजीत या रक्तदान शिबिरा बद्द्ल मनापासून समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी गोपाळसा दर्बी, नित्यानंद दर्बी, लक्ष्मण दर्बी, जयंत दर्बी, कलबुरगी सर, जयेश गोरख, संजीव काटवे, गिरीश दर्बी, जयेश दर्बी, यशपाल दर्बी, राजेश दर्बी, आमरेश दर्बी, जय दर्बी, पुजा गोरख, अमृता काटवे, एडवोकेट. मंगला जोशी, हेमा चिंचोळकर, डॉ. सचिन पांढरे, सुधाकर जाधव, सुतकर सर, यांच्यासह इतर दर्बी परिवार वर्ग,मित्र परिवार, दर्बी परिवार कर्मचारी वर्ग, व इतर समाज बांधव यांची मोठी उपस्थिती होती.
