येस न्युज नेटवर्क : बजी गेम हा प्रकार आताशा जवळपास प्रत्येकाला माहिती झाला असावा. मोबाईलवरच्या या गेममुळे लहान मुलांना त्याचं वेड लागल्याची तक्रार अनेकदा पालक करताना दिसतात. पबजी गेमच्या अनेक दुष्परिणामांमुळे भारतात या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील या गेममुळे जगभरातल्या तरुणाईला आणि लहान मुलांना वेडं करून सोडलं आहे. अशा पराकोटीच्या प्रभावामुळे अनेकदा गंभीर दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले असून पाकिस्तानमध्ये अशीच एक भीषण घटना घडली आहे. या गेमच्या नादात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्याच कुटुंबाला संपवल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना घडलीये पाकिस्तानच्या लाहोरमध्ये. लाहोरमधील काहन भागामध्ये गेल्या आठवड्यात ४५ वर्षीय नाहिद मुबारक, त्यांचा २२ वर्षांचा मुलगा तैमुर आणि त्यांच्या इतर दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह पोलिसांना त्यांच्या राहत्या घरात आढळून आले होते. एकाच कुटुंबातल्या चौघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या सर्व कुटुंबात सर्वात लहान १४ वर्षीय अल्पवनीय आरोपी जिवंत राहिला होता. त्यामुळे पोलिसांनाही संशय आला. मात्र, या मुलाची चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला.