• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 12, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – पालक सचिव संजय सेठी

by Yes News Marathi
February 12, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – पालक सचिव संजय सेठी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- सोलापूर जिल्हा हा वस्त्रोद्यगांमध्ये संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. चादरी, टॉवेल व स्कूल युनिफॉर्मचे हब सोलापूर होत असून परदेशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे त्यामुळे वस्त्रोद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी यासाठी सोलापूर येथे टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेऊ, असे प्रतिपादन परिवहन व बंदरे, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभागाचा आढावा पालक सचिव श्री. सेठी यांनी घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

  पालक सचिव श्री. सेठी पुढे म्हणाले की, वस्त्रोद्योगात सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नाव आहे व येथे पोषक वातावरण तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन सोलापूर जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. टेक्स्टाईल पार्क निर्माण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक प्रमाणात चालना मिळेल. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा डाळिंब उत्पादनात अग्रेसर असून केळी निर्यातीत ही राज्यात प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे जिल्ह्यात डाळिंब व केळी पिकावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासन स्तरावरून करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र शंभर दिवसात साफ सुत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाने या कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग घेऊन कार्यालयात नागरिकांना विविध सोयी सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या तक्रारी व कामे वेळेत मार्गी लावून त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कार्यालयाच्या स्वच्छतेबरोबरच अभिलेखांचे वर्गीकरण ही योग्य पद्धतीने करून ठेवावे व हा कार्यक्रम सातत्यपूर्ण सुरू ठेवावा, असे निर्देश पालक सचिव सेठी यांनी दिले.  
   

   जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात उद्योगांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे चिंचोली एमआयडीसी व अक्कलकोट एमआयडीसी अंतर्गत उद्योगांना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने आवश्यक पावले उचलावीत. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेलेला असून लवकरच हवाई मार्गाने ही जोडला जाईल त्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला अधिक चालला मिळेल असे श्री. सेठी यांनी सांगून विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून सोलापूर येथून विमान सेवा सुरू होण्याच्या अनुषंगाने येत असलेल्या अडचणीचा सविस्तर आढावा घेऊन त्यातून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.  

 एक एप्रिल 2019 पूर्वी जे शासकीय वाहने खरेदी करण्यात आलेली आहे त्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिनांक 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व खाजगी वाहनांनाही बंधनकारक असल्याची माहिती श्री. सेठी यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची तसेच वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी येत असलेल्या अडचणींची माहिती देऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याची मागणी त्यांनी केली तर शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक सोयी सुविधांची माहिती दिली. 

 प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री महोदयांचा सात सुत्री कार्यक्रमा अंतर्गत शंभर दिवसात प्रत्येक शासकीय विभागाने करावयाच्या कामकाजाची माहिती देऊन आज रोजी पर्यंत करण्यात येत असलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती पीपीटी द्वारे सादर केली.

सोलापूर विमानतळाला भेट
सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय शेट्टी यांनी शासकीय विभागांचा आढावा घेतल्यानंतर होडगी रोड येथील सोलापूर विमानतळाला भेट देऊन विमानतळाची पाहणी केली व कामकाजाची माहिती घेतली. तसेच विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने येत असलेल्या अडचणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बंजारा व श्रीमती अंजनी यांच्याकडून जाणून घेतल्या. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार हेही उपस्थित होते.

Previous Post

गॅरेज चालकाच्या मुलींची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी

Next Post

शिंदेंच्या सत्कारावरून मविआत वादळ…पवार-ठाकरे गटाची एकमेकांवर चिखलफेक

Next Post
शिंदेंच्या सत्कारावरून मविआत वादळ…पवार-ठाकरे गटाची एकमेकांवर चिखलफेक

शिंदेंच्या सत्कारावरून मविआत वादळ…पवार-ठाकरे गटाची एकमेकांवर चिखलफेक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group