५१ शक्तीपीठातील प्रथम शक्तीपीठ म्हणून इतिहासात नोंद असलेल्या भावसार समाजाची कुलस्वामीनी, समस्त भक्तांची देवी श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या गुरूवार दि.२७.०३.२०२५ रोजीच्या प्रकट दिनाप्रित्यर्थ भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.
भावसार समाजाच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे श्री हिंगुलांबिका देवी प्रकटदिनाप्रित्यर्थ सोलापूर शहरासह देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा केला जाणार आहे. त्यानुसार फाल्गुन वद्य त्रयोदशी शके १९४६ गुरूवार दि.२७ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.०० वा. श्री हिंगुलांबिका मातेच्या मुर्तीस २१ ते ५१ फळांचा अमृतरसाने महा अभिषेकाचे यजमानपद अमित अशोक देवळे, मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाभिषेकानंतर श्री देवीस वस्त्र, सुवर्णालंकार अर्पण करून मंत्रोपचारानंतर महाआरती करण्यात येणार आहे.
सदर दिनी सायं. ४.०० वा. शिवस्मारक, हु. शिंदे चौक येथून श्री हिंगुलांबिका मुर्तीच्या प्रतिकात्मक मुर्तीसह, समाजातील विविध संस्थेच्यावतीने लेझीम, झांज, शक्ती प्रयोग, पारंपारीक वाद्य, ढोलपथक तसेच देव देवतांच्या वेशभूषेतील कलाकारासह वाजत गाजत समाजातील सुमारे ३-४ हजार समाज बांधव, युवक युवती सहभागी होवून ही शोभा यात्रा मान्यवरांच्या हस्ते पूजनाने पुढील मार्गाने मार्गस्थ होणार आहे
शोभायात्रेचा प्रारंभ सायं. ५.०० वाजता होवून शिवस्मारक, पारस इस्टेट, नवी पेठ, राजवाडे चौक, दत्त चौक, सोन्या मारूती, माणिक चौक, समाचार चौक, भावसार रोडवरून गुरूवार पेठ, संयुक्त चौक मार्गे मंदिरात महाआरती संपन्न होवून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून विसर्जन होणार आहे.
तसेच या शोभा यात्रेच्यामार्गावर जागो जागी पुष्पवृष्टी, पुजन समस्त समाज बांधव व देवी भक्तांच्यावतीने करण्यात येणार आहे.
यावेळी पुरूष पांढरा ड्रेस व महिला भगवीसाडी परिधान करणार आहेत.