• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना चहासोबत कालबाह्य तारखेची बिस्किटे दिल्याची प्रवाशाने केली तक्रार

by Yes News Marathi
March 8, 2023
in मुख्य बातमी
0
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना चहासोबत कालबाह्य तारखेची बिस्किटे दिल्याची प्रवाशाने केली तक्रार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सोलापूर : मोठा गाजावाजा करून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा बावटा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सार्वत्रिक कौतुक होत असताना याच गाडीत प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रारही नोंदविली आहे.
  • गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. संपूर्ण वातानुकूलित, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त, आरामदायी आणि मध्यम जलदगती गाडी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वत्र उत्सवी थाटात, मोदी-मोदीचा धोशा लावत, वाजत-गाजत स्वागत करण्यात आले होते. प्रवाशांमध्येही याबद्दल समाधानाची भावना व्यक्त होत असताना या वंदे भारतला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
  • तथापि, सोलापूरहून मुंबईला निघालेल्या याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खानपान सेवेचा अनुभव प्रवाशांना आला. नागेश पवार हे सोलापूरहून मुंबईला याच गाडीतून प्रवास करीत होते. एकक तर सकाळी १५ मिनिटे उशिरा वंदे भारत एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक सोडले. पुढे काही वेळातच प्रवाशांना खानपान सेवेचा भाग म्हणून चहा-बिस्किटे देण्यात आली. परंतु चहासोबत दिलेली बिस्किटे उत्सुकतेपोटी न्याहाळली असता ही बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यामुळे प्रवाशांना धक्का बसला. त्याचा अनुभव नागेश पवार या प्रवाशाला प्रत्ययास आला. तेव्हा त्यांनी तेवढ्याच सजगतेने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली.
  • यासंदर्भात पवार यांनी तक्रारीची चित्रफित तयार करून समाज माध्यमातून प्रसारीत केली. यात चहासोबत त्यांना देण्यात आलेल्या बिस्किटाच्या पाकिटावर बिस्किटाची उत्पादन केल्याची तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे. कालबाह्य तारीख २५ फेब्रुवारी २०२३ अशी आहे. दरम्यान, यासंदर्भात मध्य रेल्वे सोलापूर विभागीय प्रशासनाचे लक्ष वेधले असता वंदे भारत एक्सप्रेसमधील खानपान सेवा आयआरसीटीसीमार्फत केली जाते. याबाबत चौकशी करण्याची माहिती देण्यात आली.

Previous Post

अभिनेत्री प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर काही मस्त पण जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

Next Post

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक

Next Post
प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group