गाडीची बॅटरी लंपास
येस न्युज मराठी नेटवर्क ; जेल रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सम्राट चौक नजीकच्या प्रभाकर महाराज रोड वरील रोहित नरेशकुमार वेद यांच्या गाडीची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
हॉटेलमधून दारूची बाटली चोरली
हॉटेल पुष्कर बार अँड रेस्टॉरंटच्या पाठीमागील दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम चिवास रिगल कंपनीची दारूची बाटली आणि एक कॉम्प्युटर व सीपीयू चोरून नेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . पोलीस हवालदार घुगे अधिक तपास करीत आहेत.
नऊ वर्षाच्या मुलासह आईचे घरातून पलायन
प्रियांका धनराज देडे आणि त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा धैर्य धनराज देडे हे कल्याण-नगर भाग-3 येथील घरांमधून 5 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता अचानक निघून गेल्याची फिर्याद लिंबाबाई नागनाथ पात्रे यांनी दिली आहे . विजापूर नाका पोलीस स्टेशनचे हवालदार याप्रकरणी तपास करीत आहेत.
मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघड
पोलीस आयुक्तालयाच्या सोलापूर शहर गुन्हे शाखेने प्रदीप ऊर्फ पद्या मनोज मसलकर याला ताब्यात घेऊन त्याने चोरलेल्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. होंडा कंपनीच्या तीन आणि हिरो कंपनीची पॅशन प्रो अशा या चार मोटारसायकली असून जेलरोड मध्ये दोन मोटरसायकल प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस चौकीत एका मोटरसायकली बाबत आणि फरासखाना पोलिस स्टेशन पुणे शहर येथे एका मोटरसायकली चोरीला गेल्या बाबत गुन्हे दाखल आहेत. पद्या मसलेकर हा कालिका मंदिर ते पोटफाडी चौक या मार्गावरून चोरीचे मोटार घेऊन विक्रीसाठी जाणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.