शाळेत असताना कोऱ्या पानावर मोठे डोंगर, एक सूर्य, नारळाची २ झाडं, एखादी नदी आणि एक आपल्या कल्पनेतलं २ खिडक्याचं आणि एका दरवाज्याचं वर टोक असलेलं घर हे चित्र आपण सर्वांनी काढलं आहे. घराची संकल्पना आपल्या मनात तेव्हा पासून रुजली आहे. नुकताच हातात खडू पकडायला सुरुवात केलेली लहान निरागस मुलं जेव्हा घराच्या भिंती रंगवतात, तेव्हा ते भिंतीवर उमटलेलं ओबड धोबड, वेड्या वाकड्या रेषा असणारं चित्र आपल्या मनावर मात्र एक सुंदर आठवण कोरून जातं.
घरामध्ये अशा अनेक आठवणी आपण नकळत बनवतो. भाऊ – बहिणीसोबत केलेली मस्करी, हॉल मध्ये असलेल्या एकाच टीव्ही समोर बसून बघितलेले चित्रपट, रोज सकाळची बाबांची ऑफिसला जायची गडबड, दसरा-दिवाळीला आईने दारात काढलेली ती ठिपक्यांची रांगोळी, नियमित पणे उन्हाळ्याच्या सुट्टीत माळ्यावरून काढला जाणारा तो कुलर, आणि त्याच्या हवेसाठी भांडणारे भावंडं, बिल्डिंग मधल्या मित्रांना घरी बोलवून केलेले कित्येक वाढदिवस!
अशा असंख्य आठवणींचा साक्षीदार ठरतं आपलं घर. अशी ही वास्तू, जिथे फक्त आपण राहत नाही तर आपण आपल्या आठवणी बनवतो.
आणि असे घर आम्ही तुम्हाला मिळवून देतो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.