सोलापूर : सोलापूर सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन असोसिएशनतर्फे सोलापूर इंडस्ट्रीज प्रीमियर लीग – २०२६ अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चिंचोळीकाटी ग्रामपंचायतीच्या धर्मराज मंदिर मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सोलापूर औद्योगिक क्षेत्रातील एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील उद्योग व शासकीय मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी. रामरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, स्पर्धा समिती प्रमुख म्हणून गणेश सुत्रावे, अभिषेक तापडिया, शिवशंकर आंधळकर, कमलेश शहा, रामेश्वरी गायकवाड, तारासिंग राठोड, जयपाल महिंद्रकर, शुद्धोधन गायकवाड व सुरेश हिटनहळ्ळी हे कामकाज पाहत आहेत.
या स्पर्धेसाठी बालाजी अमाईन्स लिमिटेड, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड व प्रभू रॉकशेप मशिनरी लिमिटेड यांनी प्रमुख प्रायोजकत्व स्वीकारले असून, लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रा. ली, कोयना शिलाई मशीन, स्मृती ऑर्गॅनिक्स लिमिटेड व कृष्णा फॅब्रिकेशन हे सहप्रायोजक आहेत.
स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघास ₹२५,००० व ट्रॉफी, उपविजेत्या संघास ₹१५,००० व ट्रॉफी, तर दोन सेमीफायनलिस्ट संघांना प्रत्येकी ₹५,५०० व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.
तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी ₹३,०००, तर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट विकेटकीपर व बेस्ट फील्डर यांना प्रत्येकी ₹२,००० व ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय फेअर प्ले टीम साठी स्वतंत्र ट्रॉफी ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी संघ पुढीलप्रमाणे आहेत :
1. स्मृती ऑर्गॅनिक्स लिमिटेड – स्मृती रायझिंग स्टार्स
2. बंग डाटा – बंग सुपर किंग्ज
3. ओ. सी. स्पेशालिटी – ओ. सी. टायगर्स
4. प्रिसिजन, अक्कलकोट रोड – प्रिसिजन पँथर्स
5. लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रा. लि. – एलएचपीयन्स
6. सृजन फूड्स
7. वामसी लॅब्स – वामसी स्मॅशर्स
8. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स – प्रिसिजन परफेक्ट
9. जी. आर. पी. लिमिटेड
10. बालाजी अमाईन्स – बालाजी टायटन्स
11. सनराईज इंडस्ट्रीज
12. काकडे इलेक्ट्रिकल्स
13. स्मृती ऑर्गॅनिक्स, अक्कलकोट रोड – स्मृती लायन्स
14. एमआयडीसी फायर ब्रिगेड
15. आर्टीस ऍग्रो – आर्टीस शिलेदार
16. ऍक्वा ड्राय – सुपर किंग्स

