सोलापूर : माघवारी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून ही परंपरा खूप मोठी आहे. वारकरी परंपरा ही संपूर्ण विश्वा मध्ये विलक्षण असून वैभवशाली आहे. पाचाच एक भाग म्हणजे माधवारी असून ती निष्ठेने सांभाळली जाते. 200 वर्षा पेक्षा जास्त काळ झाला तरी वारी परंपरा तशीच टिकून आहे. सोलापूर शहरातील 33 व परिसरातील 25 दिंडी आणि 50 भजनी मंडळ या सर्वाच्या उपस्थिती मध्ये 24 जाने. ला दुपारी 3.00 वा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पूजन निळोबा जांभळे महाराज, सुमंत शेळके व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन पांडुरंग जगताप, नामदेव रणदिवे, भूषण जाधव यांचे हस्ते केले जाणार असून पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर सुरेश फलमारी (अध्यक्ष) यांचे कडून सर्व विणेकरी महाराजाचा सन्मान केला जाणार आहे. नित्यनेम भजन करून प्रस्थान केले जाईल. हा पालखी सोहळा” ज्ञानोबा तुकाराम भजन करत नॉर्थकोट प्रशाला मैदान, पार्क चौक, सोलापूर येथे पोहोचेल तदनंतर अखिल भाविक वारकरी मंडळा कडून जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), संजय पवार (शहर अध्यक्ष), मोहन शेळके (प्रदेश सचिव), इ. पदाधिकारी गोल रिंगण लावून घेतले जाईल. नामदेव पूलगम, विष्णुपंत मोरे महाराज व उपस्थित मान्यवरांचे हस्ते अश्व पूजन व गणेश भंडारे, गजानन जगताप यांचा सन्मान केला जाणार आहे.
तदनंतर गोल रिंगण सोहळा प्रारंभी ध्वजा (पताका धारी रिंगणा सहित पारंपरिक इतर रिंगण पूर्ण करून शेवटी अश्व रिंगण सुरु होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी हजारों महिला व पुरुष, अबाल वृद्ध उपस्थित राहणार आहेत. तिथून सर्व दिंडीतील वारकरी श्री महादेव मंदिर साठे बाळ, सोलापूर या ठिकाणी येऊन आरती नंतर सांगता करून पालखी मुक्कामी राहणार आहे. तिथून पुढे दि. 25 ता. स.8.00 वा. विठ्ठल मंदिर, गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर येथून तिन्हे मार्गे पालखी सोहळा मार्गस्थ होईल. हा संपूर्ण सोहळा सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणार असून यासाठी बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), सचिन गायकवाड (उपाध्यक्ष), तानाजी बेलेराव (संघटक), कुमार गायकवाड, इ. पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
माघवारी मध्ये एकूण पाच रिंगण सोहळा होणार आहे.
1) दुसरा गोल रिंगण सोहळा दि. 26-01-2026 रोजी स. 9.30 वा. पाटकर वस्ती, कुरुल ता. मोहोळ
2) तिसरा गोल रिंगण सोहळा दि. 27-01-2026 रोजी स. 9.30 वा. महात्मा गांधी प्रशाला, पेनूर ता. मोहोळ
3) चौथा गोल रिंगण सोहळा दि. 27-01-2026 रोजी दु. 4.30 वा. श्री दत्त विद्यामंदिर (प्रशाला) सुस्ते ता. पंढरपूर
4) पाचवा उभा रिंगण सोहळा दि. 28-01-2026 रोजी दु. 9.30 वा. श्री जलाराम महाराज मठ समोर पंढरपूर

