सोलापूर : भगवान परशुराम जयंती निमित्त सोलापूर शहरात मंगळवारी दि. 29 एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दुपारी चार वाजता दत्त चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. नवी पेठ,चौपाड, मेकॅनिकी चौक, प्रभात थिएटर वरून चार हुतात्मा पुतळा येथे मिरवणूकीचा
समारोप करण्यात आला. पारंपारिक वाद्यांच्या सहाय्याने काढण्यात आलेली मिरवणूक व अडीचशे समाज बांधवांचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले.



मिरवणुकीत तरुण-तरुणींचे लेझीम पथक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपली सेवा अर्पण करत होते.मिरवणुकीस सोलापूर शहरातील ब्राह्मण समाजातील नेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह बहूसंख्येने ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते.
देशभरात आज भगवान परशुराम जयंती साजरी केली जाते. सोलापुरात यानिमित्त ब्राह्मण समाजातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी चार हुतात्मा पुतळा परिसरात मंत्रोच्चारात भगवान परशुराम जयंती साजरी केली.


मोहन दाते,
दाते पंचांगकर्ते, सोलापूर.
यंदा परशुराम जयंती निमित्त सोलापूर शहरात राज्यामध्ये सर्वाधिक मोठा अडीचशे समाज बांधवांचे लेझीम पथक सादर करण्यात आले.
संतोष पंतोजी, पदाधिकारी, भगवान परशुराम जन्मोत्सव समिती.