सोलापूर – देशभरात बंजारा समाजाला अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) चे आरक्षण असताना महाराष्ट्रात केवळ विमुक्त जाती (VJ) म्हणून आरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीत महाराष्ट्रातील बंजारा समाज मागे पडला असून, समाजात विशेषतः सुशिक्षित तरुणांमध्ये नाराजी व अस्वस्थता वाढली आहे.
हैद्राबाद गॅजेटियरमध्ये बंजारा, लंबाडा व सुगळी समाज हा भटकंती करणारा व आदिवासी जीवनशैली जपणारा समाज असल्याची नोंद असल्याने, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बंजारा (ST) आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीच्या पुढाकाराने जिल्हास्तरावर मोठे मोर्चे आयोजित केले जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मोर्चा सकाळी ११ वाजता नेहरूनगर येथील संत सेवालाल चौकातून सुरुवात होऊन पुढे अशोकनगर, जुना विजापूर नाका, संभाजी तलाव, पत्रकार भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली.
या मोर्चात १० ते १५ हजार समाजबांधव व बंजारा भगिनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोर्चात राज्याचे वरिष्ठ नेते आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार देवानंद चव्हाण, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना अध्यक्ष देविदास राठोड, राष्ट्रीय गोर सिकवाडीचे अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हैद्राबाद गॅजेटियरच्या नोंदीनुसार बंजारा समाजाला ST आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला असून, समाजातील सुशिक्षित युवकांनी राजकीय पक्ष व संघटनांपलीकडे एकत्र येऊन या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोर बंजारा (ST) आरक्षण कृती समितीकडून करण्यात आले आहे.
या मोर्चास बंजारा समाजातील नेते मोतीराम चव्हाण, प्रा.भोजराज पवार, सुभाष चव्हाण, अलका राठोड, युवराज (भैय्या) राठोड, युवराज (डी.एम.) चव्हाण, नाम पवार, संदीप राठोड, सचिन चव्हाण, विजय राठोड, सुरेश पवार, लाला राठोड, मोतीराम राठोड, प्रकाश राठोड, बंटी राठोड, शैलजा राठोड, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, प्रेमसिंग राठोड, मिथुन चव्हाण, युवराज (पिंटु) चव्हाण, सचिन पवार, रतन राठोड, बाळासाहेब राठोड, प्रताप राठोड, प्रविण चव्हाण, दिपक पवार, प्रविण पवार, महेश पवार, बाबु मालक, सुभाष पवार, अशोक चव्हाण, राजेंद्र महाराज, चाचा चव्हाण, सुरेश पवार, शामसुंदर राठोड, अविनाश राठोड, बबलु जाधव, दशरथ चव्हाण, हिरालाल पवार, पांडुरंग पवार, केशव पवार, शिवलाल राठोड, मेजर राठोड, आ.डी.चव्हाण, देसू जाधव, रामु पवार, दामु राठोड, उमाकांत राठोड, गोविंद रजपूत, किरण चव्हाण, धनसिंग राठोड, अशोक रजपूत, फुलसिंग चव्हाण, पृथ्वीराज राठोड, अंकुश राठोड, भगवान चव्हाण, गोविंद राठोड, तुकाराम राठोड, लक्ष्मण पवार, व्यंकटेश राठोड, आत्माराम राठोड, आकाश राठोड, गोरख पवार, सुरेश पवार, सचिन चव्हाण, नामदेव राठोड, नारायण राठोड, किसन पवार, भाऊ राठोड, सखाराम पवार, धर्मा जाधव, मोतीलाल राठोड, बाबु जाधव, हरीसिंग राठोड, राजु राठोड, धर्मराज राठोड, गजानन राठोड, अशोक पवार, मोतीराम जाधव, सुनिल राठोड, दिनेश जाधव, ब्रह्मदेव महाराज यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..