महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे काळ्या टोपीखालचा सडका मेंदू असणारा व्यक्ती असाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दाम्पत्य हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाची अस्मिता आहे. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करून राज्यपालांनी महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. असे वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी बक्षीहीप्परगे येथील शेतकरी मेळाव्यात केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांच्या वतीने बक्षीहीप्परगे तालुका दक्षिण सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवन मरणाच्या प्रशावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे लोक वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. याबरोबरच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामनी , बक्षीहीप्परगे , मुळेगाव , कासेगाव , दोड्डी आदींसह १४ गावचा प्रलंबित पाणी प्रश्न सोडवून त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी आगामी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाषणात बोलताना सांगितले.
प्रस्ताविकपर भाषणात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा माने यांनी शेतकऱ्यांच्या जीवनशैलीच्या मुद्द्यावर लक्ष वेधले. शेतकरी जगाचा पोशिंदा असून आज तो स्वतः उपसमारीचा बळी ठरत आहे. कृषिप्रधान भारत देशात शेतकरी जगला तरच देश जगेल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असून येत्या काळात समाजातील उच्चभ्रू लोकांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत सहकार्याची भावना ठेवणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.आपल्या खुमासदार भाषनशैलीत कार्यक्रमाचे आयोजक महेश माने यांनी राज्य व केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर हे हरवले आहेत की हिमालयात गेले हे भाजपच्या लोकांनी सांगावं. लोकसभा निवडणुकीत जयसिद्धेश्वर यांनी मी तर सन्यासी आहे असे म्हणलेल्या वाक्याचा समाचार घेत संन्यास्याने सोलापूरला संन्यासी बनविण्याचे धोरण आखले आहे. अक्कलकोट चे आमदार सचिन कल्ल्यानशेट्टी हे बारसे , मुंज , वाढदिवस , डोहाळे जेवण असल्या कार्यक्रमांना हजेरी लावत लोकांचे लक्ष विकासकामे आणि समस्या यांच्यावरून दुर्लक्षित करीत आहेत. सुभाष देशमुख हे स्वमंगल करणारे नेते असून त्यांनी तर चक्क वराह घोटाळा केला आणि सोलापूरची मान शरमेने खाली केली असे म्हणाले. सीमावादाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाजप आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या मावळ्यांनी घाम गाळून रक्त सांडून हा महाराष्ट्र उभा केला आहे. ह्या महाराष्ट्रातील मातीही तुमच्या हाती लागू देणार नाही. त्याबरोबरच येत्या काळात दक्षिण आणि अक्कलकोट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संघटन मजबूत करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अविरतपणे लढणार असल्याचे महेश माने यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम काका साठे प्रमुख वक्ते आमदार अमोल मिटकरी कार्यक्रमास महेश माने यांच्या मातोश्री रुक्मिणी माने ,मनीषा माने , तुकाराम कोळेकर , अक्कलकोट विधानसभा अध्यक्ष बळी हेबळे , बक्षीहीप्परगे ग्रामपंचायत सदस्य भाऊराव जाधव , बालाजी यादव , तालुका कार्याध्यक्ष रियाज शेख , युवक अध्यक्ष संगमेश बगले , रेणुका खेत्री , गोपिका गायकवाड , तालुका उपाध्यक्ष राम जाधव , सचिव रथीलाल राठोड , शालेय समिती अध्यक्ष राहुल जाधव , शुभम यादव , श्रीधर यादव , मलिक शेख , अकबर शेख , प्रा. हणमंत पवार , अमोल फंड , सोमनाथ पाटील, मोहसीन फुलारी , महासिद्ध गायकवाड , दत्तात्रय नरवडे , अरविंद कांबळे , नागेश कोकाटे , प्रल्हाद काशीद , नानासाहेब जाधव , परशुराम काताळे आदी उपस्थित होते. आभार हणमंत पवार यांनी मानले.