सोलापूर : परिक्षेच्या तणावामुळे सोलापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकमध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये व्दितीय वर्षात शिकणार्या कु. स्मृती या मुलीला हार्ट अॅटक आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी सिव्हील हॉस्पिटलमधील पोलीस चौकीत नोंद झाल्याचे समजते.
- शाळा, महाविद्यालय आणि विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी शासन स्तरावर परिक्षेचा, अभ्यासाचा प्रचंड ताण विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतो. आपण शिकवलेलेच बरोबर अन्य शिक्षकांनी दिलेली माहिती चुकीची या तणावाखाली विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था, दिवसातील अनेक तास कॉलेज आणि प्रात्यक्षिके यातच गेल्यानंतर घराकडे जाण्यासाठी मिळणारा वेळही प्रवासात जात असल्याने विद्यार्थ्यांच्या ताण तणावात प्रचंड वाढ होत आहे. त्यात घरातील मंडळींकडून मोठ्या अपेक्षेच्या ओझ्याने विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना असाईनमेंट, प्रॅक्टिकल परीक्षा, होम वर्क, आठवडा परिक्षा अशा विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रचंड तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. याला तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यामुळेच सोलापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकमध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये व्दितीय वर्षात शिकणार्या स्मृती या मुलीला परिक्षेच्या तणावामुळे हार्ट अॅटक आल्याची माहिती मिळाली आहे.