सोलापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या हिवाळी-2024 परीक्षेत ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत एकूण 889 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 327 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले; तर 256 विद्यार्थी उत्तम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत, तसेच 18 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.
तसेच तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील शोभा बिरादार हिने 95.78% गुण मिळवून महाविद्यानात प्रथम येण्याचा मान मिळवला, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी अंकिता शिरसाळ हिने 95.18% गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला; तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या स्नेहा जाधव हिने 94.95% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग च्या विद्यार्थिनी स्नेहा जाधव, मेघना जाधव व श्रेया होर्ती; तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची अंकिता चव्हाण, पूजा लोणी, शुभम सलगरे व आनंद बगले यांना प्रत्येकी एका विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.
विभागवार प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
सिव्हिल इंजिनिअरिंग :
विवेक राऊत (प्रथम वर्ष) 80.47%
शुएब खैरदी (द्वितीय वर्ष) 81.89%
पृथ्वीराज लेंगरे (तृतीय वर्ष) 93.10%
मेकॅनिकल इंजिनिअरिंग :
महेश मुल्का (प्रथम वर्ष) 84.24%
सत्येंद्र कुमार ठाकूर (द्वितीय वर्ष) 91.11%
साईलक्ष्मी पुजारी (तृतीय वर्ष) 81.33%
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग :
शिवराज चुंगीवडियार (प्रथम वर्ष) 85.53%
यशराज कोळेकर (द्वितीय वर्ष) 91.88%
दानिश बेगमपुरे (तृतीय वर्ष) 90.40%
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग :
प्रणिती कुरापाटी (प्रथम वर्ष) 83.88%
सई ब्याळे (द्वितीय वर्ष) 92.30%
स्नेहा जाधव (तृतीय वर्ष) 94.95%
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग :
प्रथमेश सावणे (प्रथम वर्ष) 90.71%
अंकिता शिरसाळ (द्वितीय वर्ष) 95.18%
शोभा बिरादार (तृतीय वर्ष) 95.78%
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेकडून गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य एस. के. मोहिते यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, विभाग प्रमुखांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.
सदर गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यास शैक्षणिक समन्वयक एस. एन. गवंडी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. एम. कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एन. बी. पवार, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख टी. एल. पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख . एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी व प्रथम वर्ष इन्चार्ज . व्ही. आर. आवटे हे उपस्थित होते