सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील तंत्रज्ञाने प्रथम वर्षातील विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचा त्रिकोण साधण्याचा उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून एक अनुभवी व्यवसायिक आणि करियर मार्गदर्शक प्राध्यापक विजय नवले यांना बोलवण्यात आले होते. विजय नवले सरांनी या कार्यक्रमात पालकांसाठी पालकत्वाची भूमिका आणि त्यात येणारे अडथळे यांच्यावर मात कशी करायची हे उदाहरण देऊन पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीमध्ये पालक ही पहिली बेसमेंट आहे आणि ही बेसमेंटच त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुलभ करण्यासाठी मदतनीस ठरते, असेही त्यांनी पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कुठलीही जबरदस्ती न करता त्यांचा एक मित्र म्हणून आयुष्याचा सारथी होण्याचा प्रयत्न करा असेही त्यांनी पालकांना आवाहन केले. मुले आपल्या पालकांचे अनुकरण करतात त्यामुळे आपण नवीन कार्याची सुरुवात ही आपल्यापासून करावी आणि शब्दरूपी शस्त्राचा वापर न करता प्रत्यक्ष प्रयोगातून कुठलीही गोष्ट मुलांना समजावण्याचा प्रयत्न करा असेही त्यांनी पालकांना सांगितले.
विजय नवले सरांनी पालकत्वा बरोबरच विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांची भूमिका काय असायला पाहिजे यावरही छान मार्गदर्शन केले. घेतलेले शिक्षण आणि शिकलेली कला कधीच वाया जात नाही, योग्य वापर कसा करायचा आहे जमायला पाहिजे यासाठी त्यांनी अनिल कुंबळे या क्रिकेटरचे उदाहरण दिले. अनिल कुंबळे यांनी घेतलेल्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा उपयोग हा क्रिकेटमधील करिअर घडवण्यासाठी केला. आत्मविश्वास वाढण्यासाठी ही शिक्षण खूप महत्त्वाचे आहे असे नवले सरांनी सांगितले. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या कार्यात पंतप्रधान मोदींना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन-नवीन प्रकल्पांवर काम केले पाहिजे आणि त्यांना प्रश्न पडले पाहिजेत तरच ते उत्तर शोधण्यासाठी हात-पाय हलवतील असाही सल्ला त्यांनी दिला. संवेदनशीलता ही आजच्या मुलांमध्ये जागृत झाली पाहिजे कारण हेच उद्याचे जबाबदार नागरिक आणि कर्तव्यदक्ष रक्षक असणार आहेत. हे त्यांनी मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री एस ए पाटील, उपाध्यक्ष श्री एस एस पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए चौगुले व उपप्राचार्य एस के मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्षाच्या प्रा वि आर आवटे व प्रथम वर्ष विभागातील सर्व प्राध्यापक मंडळी यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस एन गवंडी आणि सौ एल एस बिराजदार यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य प्रो. एस. के. मोहिते, ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही.पोतदार, शैक्षणिक समन्वयक एस. एन. गवंडी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. एम. कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एन. बी. पवार, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख टी. एल. पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी व प्रथम वर्ष इन्चार्ज श्री. व्ही. आर. आवटे हे उपस्थित होते.