सोलापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सुजन ट्रस्ट यांच्याद्वारे मुंबई येथे आयोजित 33 व्या डिपेक्स 2024 प्रदर्शनात सोलापूरच्या ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश मिळविले.
या प्रदर्शनात राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयक अविष्काराला चालना देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त होत असते. विद्यार्थ्यांच्या नवनवीन अविष्कारांना मंच उपलब्ध करून देणे, नव उद्योजकांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कलागुणांना प्रोत्साहन देणे व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडविणे हा सदर प्रदर्शना मागचा मुख्य हेतू असतो. सदर प्रदर्शनात ए. जी. पाटील तंत्रनिकेतन मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी आदित्य बांगर, आदित्य चव्हाण, भावना बालीबगल व रविशंकर गानबोटे यांनी प्राध्यापक जी. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली “सोलार पॉवर ऑटो सायकल रिक्षा” हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पास डिपेक्स 2024 मधील एनर्जी विभाग अंतर्गत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर सिव्हिल इंजीनियरिंग विभागातील उत्कर्ष वंजारी, ओम बिलगुंडे, अनमोल काकडे व मंदार कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी विभाग प्रमुख यांनी एन. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या पिजो “पिजोइलेक्ट्रिक सोलार रोड” या प्रकल्पाला डिपेक्स 2024 मधील “संस्टेनेबल सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर” या विभागांतर्गत द्वितीय क्रमांकाचे पारितोषक मिळवले. ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधून एकूण चार ग्रुप डिपेक्स 2024 मध्ये सहभागी झाले होते.
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या महाविद्यालय स्तरावरील डिपेक्सचे मुख्य समन्वयक म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक एम. एम. कुलकर्णी यांनी काम पाहिले व विशेष परिश्रम घेतले.
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांच्या डिपेक्स 2024 मधील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर ए. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम. ए. चौगुले व उपप्राचार्य एस के मोहिते यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व विभाग प्रमुख यांचे कौतुक केले.