सोलापूर : श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था सोलापूर आयोजित पखवाज साधना हा कार्यक्रम संपन्न झाला. सोलापुरातील यश नगर मध्ये मागिल वर्षा पासुन हि संस्था कार्यरत आहे.या मृदंग वादन संस्थेकडुन वारकरी भजन,हरिपाठ,किर्तन यासाठी लागणारे वादन प्रशिक्षण दिले जाते.त्याच बरोबर मुलामुलींना वारकरी पाऊल शिकविले जातात.मुलांच्या सोबत मुलींनी ही प्रशिक्षण दिले जाते.सध्या ३५ विद्यार्थी ह.भ.प.अनिकेत जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत.सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा ते राञो नऊ वाजे पर्यत वेगवेगळ्या गटाचे टाळ वाजवुन पखवाज रियाज मोफत घेतला जातो.संस्थेच्या प्रथम वर्ष पुर्ती निमित्ताने या वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री छञपती शिवाजी महाराज स्तुती पोवाडा,रामकृष्ण हरि भजन,भगवान शंकराचे स्तवन, सांप्रदायिक टाळ पखवाजाच्या साथिने सादर करण्यात आले. छञपती शिवरायांच्या मुळेच संप्रदाय टिकला अन्यथा मोगलांच्या काळात उघडपणे भजन करण्यास बंदी होती.वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान म्हणून भगवान शंकरांच्या कडे पाहीले जाते.हरि हरा भेद ! नाही नका करु वाद !! हरि हरा मध्ये भेद नाही म्हणूनच शंकर भगवान स्तुती गाऊन प्रत्यय दिला.त्याच बरोबरीने प्रभु रामचंद्राचे हिंदी भजन गाउन त्या सोबत पखवाज वादन केले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प. भागवत महाराज चवरे,ज्योतीराम चांगभले महाराज,ज्ञानेश्वर सपाटे, शेखर फंड यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांचा सत्कार संयोजकांच्या वतिने करण्यात आला.या कार्यक्रमात १२ मुली व २३ मुले सहभागी होते.
विद्यार्थ्यांना संबोधीत करताना सुधाकर इंगळे महाराज म्हणाले दररोजच्या टाळाच्या माध्यमातून रियाज घेतल्यामुळेच मुले चांगल्या प्रकारे वादन करु लागली आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यक्रमाच्यासाठी फिरतो परंतु दररोज रियाज मुलांच्या कडुन करुन घेणारी संस्था हि ऐकमेव आसली पाहीजे.ही संस्था सुरु झाल्यापासुन निराळे वस्ती,जुनी पोलिस लाईन,अमराई,पाटील वस्ती या भागा वारकरी संप्रदायाला चांगली उर्जा मिळाली असे प्रतिपादन इंगळे महाराज यांनी केले.
यावेळी पंढरपूरचे ह.भ.प. भागवत महाराज चवरे यांनी संस्थेच्या चालत असलेल्या कार्याचे कौतूक केले आणि शुभाशीर्वाद दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम लोखंडे ,अविराज जांभळे ,संजय केसरे,सचिन भोसले यांनी परिश्रम घेतले.हा कार्यक्रम वै.राजुबाई जांभळे सभागृहात यश नगर येथे पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम जांभळे यांनी केले.