येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत सोलापूर शहर पोलिसांनी २ मे रोजी दिवसभरात १,६१५ वाहनांची तपासणी करून दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न वापरल्याने ५३० व्यक्तींविरुद्ध कारवाई करून २,६६,५०० रुपये दंड करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना विरुद्ध कारवाई करून ५२००० रुपये दंड करण्यात आला . मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे २४२ व्यक्तींविरुद्ध कारवाई करुन ४८ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले. या प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये जवळपास साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल झाल्याचे सांगण्यात आले. अजूनही अनेक लोक मास्क न वापरता जाताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे दुचाकीवर डबल सीट जाताना दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.