येस न्युज मराठी नेटवर्क : पोलीस आयुक्तालयाने कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई तसेच विशेष नाकाबंदी करून २१ एप्रिल रोजी सोलापूर शहरात 1574 वाहनांची तपासणी केली आणि जवळपास तीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याने ४५१ व्यक्तींविरुद्ध कारवाई करत २,२५,५०० रुपये दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने २९८ व्यक्तींविरुद्ध कारवाई करीत ६७,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आणि नियमांचे उल्लंघन केल्याने आठ आस्थापनांविरुद्ध कारवाई करून दहा हजार रुपये दंड करण्यात आला . ही कारवाई शहर वाहतूक शाखा सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी सक्षमपणे केली आहे.