सोलापूर : ग्रामीण पोलिसांनी २६ मे रोजी लॉकडाऊन काळात नाकाबंदी करून जिल्ह्यातील ३२०१ व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करून १२,५१,७०० रुपये दंड वसूल केला आहे. मास्क न वापरल्याने ८४२ व्यक्तींकडून ४,२१,००० रुपये दंड वसूल केला आहे. ई पास नसताना प्रवास केल्याने २०० जणांविरुद्ध कारवाई करून १,०९,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विनाकारण फिरणाऱ्या ८५७ व्यक्तींवर कारवाई करून ४,२८,५००० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.