सोलापूर : रामलाल चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या दोन समर्थकांची नावे निष्पन्न झाली आहेत. शरणप्पा हंडे आणि सोमलिंग घोडके ( दोघे राहणार अक्कलकोट) यांच्या विरुद्ध सदरबझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक जुलै रोजी या दोघांनी पडळकर यांच्या वाहनावर दगड टाकल्याचा गैरसमज करून घेऊन राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. पोलीस सब इन्स्पेक्टर टोकदार अधिक तपास करीत आहेत.