मध्य प्रदेश । मध्यप्रदेशात सीधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. सीधी सतनाकडे निघालेली एक बस कोलव्यात कोसळून हा अपघात झाला. या बसमधून जवळपास ५४ प्रवासी प्रवास करत होते.दुर्घटनेनंतर जवळपास सात प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले . आत्तापर्यंत ३८ मृतदेह हाती लागले आहेत तर इतरांचा शोध सुरू आहे. हा कालवा इतका खोल आहे की संपूर्ण बस कालव्याच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसत आहे.
क्रेनच्या मदतीने ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’कालवा बराच खोल आहे. आम्ही तातडीनं धरणाचं पाणी थांबवण्याचे आदेश दिले तसंच मदत आणि बचाव पथकांना रवाना करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी, एसपी आणि एसडीआरएफ पथकं मदतीसाठी हजर आहेत. बस दुर्घटनेत प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची तत्काळ मदत पुरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. हा अपघात रीवा-सीधी सीमेजवळ छुहिया घाटानजिक घडला. बाणसागर प्रकल्पाच्या कालव्यात ही बस कोसळली .