नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच दर महिण्याला सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 1 एप्रिल 2023 पासून हे नवीन दर जाहीर केले आहेत. राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपीनीच्या वीजदरात सरासरी सात ते आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महावितरणबरोबरच अदाणी, टाटा आणि बेस्टच्या वीज दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्वच संवर्गातील ग्राहकांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्वच संवर्गातील ग्राहकांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यात मार्च 2020 च्या अखेरीस विजेचे दर वाढवण्यात आले होते. वीज कायद्यानुसार 5 वर्षात वीज दरात सुधारणा केली जाते