येस न्युज मराठी नेटवर्क : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला हजेरी लावली होती. या सलिब्रिटींचे फोटोही सध्या ट्रेंड होतायत. पण सर्वांचं लक्ष वेधून घेणारा एक फोटो म्हणजे ‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णी आणि ‘सांग तू आहेस का’ फेम शिवानी रांगोळे यांचा. त्यामुळं या दोघांच्या अफेअरच्या सध्या चर्चा सुरू आहेत.