येस न्युज मराठी नेटवर्क : शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. “सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायची आहे” असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.यावेळी संजय राऊत म्हणाले, काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. ठीक आहे, करून घ्या. संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवसांपासून या सरकारला सर्व प्रश्नांचा उत्तर द्यावी लागतील.