मुंबई : आज दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील विधानभवनातील 7 मजला, कक्ष क्र. 711, येथे महाराष्ट्र शासनाची अनुसुचित जाती कल्याण समितीची प्रारंभिक बैठक समिती प्रमुख तथा आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांसमवेत संपन्न झाली.
या बैठकीमध्ये आ. यशवंत माने, लहू कनाडे, आ. सुनिल कांबळे, आ. नावदेव ससाणे, आ. तेकचंद सावरकर, आ. नरेंद्र भांडेकर, आ. अरुण लाड, आ. राजेश राठोड, विजय भाई गिरकर, आ. बलराम पाटील आदि. विधानसभा व विधानपरिषद सदस्य उपस्थित होते. सदर सदस्यांनी जणकल्याणाकरीता विविध सुचना मांडल्या व त्यावर चर्चा झाली. अनुसुचित जाती समितीची दुसरी बैठक लवकरच होणार असल्याचे समिती प्रमुख तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.