सोलापूर- ऑल इंडिया मिल्ली कौन्सिल सोलापूर शाखेच्यावतीने 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘भारतीय घटनेचे महत्त्व आणि अल्पसंख्याकांच्या हक्क’ या विषयावर एक व्याख्यान शहर काझी सय्यद अमजदअली (अध्यक्ष, एआयएसी, सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. एम.आर. कांबळे (इंग्रजी विभागप्रमुख, वालचंद महाविद्यालय) आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अ. रशीद जानवाडकर होते.
प्रारंभी ऑल इंडिया मिल्ली कौन्सिल महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी निज़ामोद्दीन शेख यांनी संविधानावर सविस्तर विचार मांडले. तसेच प्रा. कांबळे यांनी संविधानाविषयी आणि अल्पसंख्याकांच्या हक्काबद्दल माहिती दिली. याचप्रमाणे ॲड. जानवाडकर ही आपले विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात शहर काझी म्हणाले की, राज्य घटनेचा आधार त्यांच्या प्रस्तावनावरून समजला जातो आणि हे प्रस्तावना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व यावर आधारित आहे. विशेष हे सर्व गोष्टी 1400 वर्षापूर्वी कुरआन आणि प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनातून इस्लामने वर्णन केले आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरूवात मौलाना इब्राहिम मंगलगिरी यांच्या कुरआन पठणाने झाली. एआयएमसीचे उपाध्यक्ष फैज इनामदार यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. नासिरोद्दीन आळंदकर यांनी एआयएमसी स्थापने बद्दलची माहिती दिली. यावेळी डॉ. परवेज अतनूरकर, म. शफी शेख, खाजाभाई शेख, डॉ. बिजापूरे, डॉ. शफी चोबदार, डॉ. जन्नत बागबान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अ.रशीद शेख यांनी केले तर आभार एआयएमसीचे सेक्रेटरी आज़म शेख यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची समपन्न झाले.