येस न्युज मराठी नेटवर्क : सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर मधील सोशल अर्बन बँकेच्या शाखेत शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीमध्ये फर्निचर,बँकेतील काऊंटर, दोन कपाटे ,फाइल्स ,3pc टेबल-खुर्च्या जळाल्याचे सांगण्यात आले .अग्निशामक दलास रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी आग लागल्याचे कळविण्यात आल्यानंतर सावरकर मैदान आणि भवानीपेठ येथून तीन गाड्या आग विझवण्यासाठी रवाना झाल्या .
नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजलेला नाही .फायर सुपरिटेंडेंट ए.के आवटे, सहाय्यक फायर सुपरिटेंडेंट अच्युत दुधाळे, फायरमन मोरे ,माने , सलगर यांनी ही आग विझवण्यासाठी मोलाची कामगिरी केली. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सोशल अर्बन बँकेचे लाखोंचे नुकसान झाले.