येस न्युज मराठी नेटवर्क : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास वर्षभरापासून काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळालेला नाही सोनिया गांधी यांच्याकडे सध्या हंगामी अध्यक्षपदाचा पदभार आहे. अशोक गेहलोत हे सोनिया गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात . ते नवीन आणि जुन्या नेत्यांमध्ये समन्वय राखण्याची कामगिरी करू शकतात असा विश्वास कॉंग्रेसमधील सूत्रांनी व्यक्त केला आहे.