येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सदर बाजार येथील रहिवासी इस्माईल मुक्तीयार कुरेशी आणि एमआयडीसीतील बनशंकरी हॉटेलच्या मागे राहणारे मुदत सर इकबाल शेख या दोघांना बेकायदेशीरपणे अकरा गाई व एक बैल घेऊन जात असताना पोलिसांनी अटक केली आहे या दोघांनी सर्व बारा जनावरे सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता आणि जनावरांना त्रास होईल अशा पद्धतीने क्रूरतेने आणि निर्दयतेने कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ॲनिमल प्रीजर्वेशन अधिनियम 1976 च्या कलम 51 अ ब नुसार तसेच महाराष्ट्र कीपिंग एंड मोमेंट ऑफ अधिनियम 1976 च्या कलम 7 व 13 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.