येस न्युज मराठी नेटवर्क । अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. मांजरेकरांनी मारहाण केल्यानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकरांविरोधात तक्रार दिली आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणारी काही वाहने एकमेकांना धडकली. यात एक कार महेश मांजरेकरांची होती. कारला धडक बसल्यामुळे मांजरेकर गाडीतून उतरले आणि त्यांनी एका व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.