येस न्युज मराठी नेटवर्क । धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली अटक यामुळे भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विरोधक वारंवार धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप गंभीर असून पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. तर नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”.