येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपाअधिक्षक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते पडसाळी गावातील नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित गावातील नुतन सदस्य माणिक राऊत,महादेव भोसले,धर्मा रोकडे,राम माळी,ज्योतिराम पाटील,सचिन भोसले,अजित सिरसट,अमर शेख, तसेच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या ग्रामस्थांचा देखील सत्कार करण्यात आला.यावेळी येथे उपस्थित उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप,साखरे साहेब तसेच सकाळचे संतोष सिरसट,लंकेश्वर पाटील, भीमराव ढेकणे,सुधाकर सिरसट,रवी भोसले,आंनद सिरसट तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.