मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्या उद्या 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी दाखल होणार होत्या. मात्र त्या आजच ईडी कार्यालयात हजर झाल्या. दरम्यान, ईडी कार्यालयाबरोबर हळूहळू शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे. मात्र आम्ही राऊतांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत, या नोटिशीला घाबरत नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे.
ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांना रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वर्षा राऊत यांना 11 डिसेंबर रोजी नोटिस बजावण्यात आली होती. त्यावेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत 28 डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.
दरम्यान, वर्षा राऊत यांना उद्या ऐवजी आज चौकशीसाठी परवानगी दिली याचा अर्थ ईडी सूडबुद्धीने कारवाई करत नाही. आता वर्षा राऊत यांनी 55 लाखांचा काय झालं? कुठून आले ते सांगावं? अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.