सोलापूर : शहरात एकीकडे स्मार्ट सिटीचा ढोल बडविला जात असताना दुसरीकडे मात्र दूरदर्शा सुरू आहे. गल्लीबोळात सिमेंट रोड केल्यामुळे भविष्यात भूजल पातळी कमी होणार आहे.सध्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहेत त्या ठिकाणी कोट्यवधी लिटर पाणी रस्त्याने धो-धो पद्धतीने वाहत आहे .बाळीवेस, चौपाड, नवी पेठ, दत्त चौक, मस्जिद, चौपाड पोस्ट ऑफिस, विठ्ठल मंदिर या परिसरातील नागरिकांचे रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे जगणं मुश्कील झाल आहे. पाणी म्हणजे जीवन आहे.. पाण्याचा काटकसरीने वापर करा असं आवाहन करण्यात येत असलं तरी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हे मौल्यवान पाणी कोट्यवधी रुपयाचे पिण्याचे पाणी असे दररोजच वाहत आहे .याला जबाबदार कोण आणि कोट्यवधींच्या योजना अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.