येस न्युज मराठी नेटवर्क : बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. थोरात आज राजधानी दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं समजतं. आता काँग्रेस हायकमांड बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागेल.
बाळासाहेब थोरात नाराज?
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेता अशी दोन पद होतं. शिवाय महाविकास आघाडी सरकारमध्येही ते महसूल मंत्री आहेत. यातून महाराष्ट्रतील काँग्रेसचे काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी हायकमांडकडे लॉबिंग करत होते अशी चर्चा होती.प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि त्यावरुन दिल्लीत होणारी चर्चा यामुळे अखेरीस बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.