सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले. या प्रसंगी सभागृहनेते श्रीनिवास करली, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका संगीता जाधव,नगरसेविका निर्मला तांबे,विजय बमगोंडे,गोपीनाथ जाधव,चंद्रकांत तांबे, सुरेश लिंगराज,जयप्रकाश अमनगी,भास्कर सामलेटी आदी मान्यवर उपस्थित होते.