येस न्युज मराठी नेटवर्क : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा या अवनी कन्स्ट्रक्शन मध्ये भागीदार असल्याचे ईडीच्या तपासात पुढे आले आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची या प्रकरणी 72 कोटींची मालमत्ता जप्त केली असून त्यांना अटक केली आहे .संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते मात्र माहिती देण्यासाठी त्यांनी 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे . प्रवीण राऊत यांनी षड्यंत्र करत 95 कोटीची फेरफार केली यामध्ये पीएमसी बँकेकडून एचडीआयएल ने घेतलेले कर्ज तसेच ॲडव्हान्स अशा अनेक बेकायदेशीर एन्ट्री त्यांच्या अकाउंटला आहेत संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी या दोघीही अवनी कन्स्ट्रक्शन चा भागीदार आहेत..