येस न्युज मराठी नेटवर्क : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वत:चं दुकान बंद होऊ नये म्हणूनच सरकारवर सतत टीका करत असतात’, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर तोफ डागली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे पाठवलेला आहे, असे उत्तरही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. सध्या राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवर त्यांनी बोट ठेवले आहे. जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जयस्वाल हे सरकारकडून पोलीस दलात होत असलेल्या हस्तक्षेपाला कंटाळून केंद्राच्या सेवेत गेल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला.