येस न्युज मराठी नेटवर्क – वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार व उत्कृष्ट गायक ह. भ. प. अनंत इंगळे महाराज (सोलापूर ) यांना “श्री दत्त रत्न” पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक नरेंद्र कुंटे यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र ट्रॉफी शॉल श्रीफळ श्री विठ्ठल दादा सिरसीकर यांचे कडून देण्यात आला. या प्रसंगी नरेंद्र कुंटे बोलत होते. अनंत इंगळे महाराज हे वारकरी संप्रदायातील दीपस्तंभ असून निष्काम सेवेचा आदर्श आहेत. वयाच्या 85 व्या वर्षी सुद्धा भजन करण्यासाठी तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्या कडे आहे.” तुका म्हणे येथे भजन प्रमाण ” या न्यायाने त्यांनी आपल्या जीवनात भजनाला प्राधान्य दिले. भजन हा त्यांचा श्वास असून सेवाभाव हा त्यांचा स्वभाव आहे. ” हीच व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास ||” या विचाराने पारमार्थिक प्रयत्न होता. त्यांनी 60 वर्ष सतत पंढरीची पायी वारी केली असून अक्कलकोटची 25 वर्ष पायी वारी केली आहे.महाराष्ट्रतील सर्व संत भूमी मध्ये सप्ताह पारायण सोहळे केले आहेत. त्यांच्या या 65 वर्षा पेक्षा जास्त सुरु असलेल्या निष्काम सेवेमुळे त्यांना दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून “श्री दत्तरत्न ” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.त्याच वेळी त्यांच्या पत्नी जनाबाई इंगळे यांचा ही शॉल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमचा प्रारंभ गोपाळ शास्त्री जोशी यांनी वेदघोष करून केला . याप्रसंगी सुधाकर इंगळे महाराज, संजय केसरे, आदर्श इंगळे, कृष्णा चवरे, शिवानंद जाधव,समर्थ गुंड आदी उपस्थित होते. विठ्ठल दादा सिरसीकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री दत्त मंदिर गणपती घाट सोलापूर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. पसायदान घेऊन कार्यक्रमची सांगता करण्यात आली.
