येस न्युज मराठी नेटवर्क : ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे ब्रिटनला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती आणखी काही काळ लांबू शकते, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी या मंत्रालयाच्यावतीने देशात लसीच्या वाहतुकीबाबतही माहिती देण्यात आली.
हरदीपसिंग पुरी म्हणाले, “मला वाटतं की ब्रिटनला जाणाऱ्या विमानांच्या या तात्पुरत्या बंदीत आणखी वाढ होऊ शकते. मात्र, खूप काळासाठी ही बंदी सुरु राहिलं असं मात्र मला वाटत नाही.” दरम्यान, करोना प्रतिबंधक लसीच्या वाहतुकीबाबत एअर इंडियाच्या वापराबाबत नागरी हवाई उड्डान मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खरोला म्हणाले, ” करोना लसीच्या वाहतुकीबाबत आजवर आमच्यासमोर अनेकांनी रस दाखवला आला. या प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात मात्र बोली लावणाऱ्यांना या प्रस्तावावर स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे.