येस न्युज मराठी नेटवर्क । शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतात, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले असून ते दिल्लीतील शेवटच्या उपोषणावर ठाम आहेत.
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव का मिळत नाही असा सवाल करतानाच आता चर्चा, आश्वासने नकोत तर ठोस निर्णय घ्या, असे केंद्र सरकारला बजावतानाच आपण जानेवारी महिन्यातील दिल्ली येथील उपोषणावर ठाम असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे
कृषिमूल्य आयोग केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या आखत्यारीत असल्याने राज्याच्या कृषिमूल्य आयोगाच्या अहवालामध्ये नमूद केलेल्या उत्पादन खर्चात कारण नसताना १० टक्कय़ांपासून ५० टक्कय़ांपर्यंत कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य आणि केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला संविधानिक दर्जा देण्याबरोबरच स्वायत्तता देणे गरजेचे आहे असे हजारे यांनी म्हटले आहे.